१.     आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा शेती तसेच शेती पूरक व्यावसायात जास्तीत जास्त उपयोग    व्हावा या दृष्टीने प्रयत्न करणे.

२.     शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल हा उद्देश समोर ठेऊन त्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करणे.

३.     सर्व प्रकारची कृषी माहिती एकाच छत्राखाली उपलब्ध होईल. अशा प्रकारची संगणकीकृत व्यवस्था तयार करणे.

४.     शासकीय तसेच खाजगी संस्थाकडून शेतकऱ्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणे.

५.     शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारणे. तसेच पशु विकसीत व्यवसायास चालना देणे.

६.     पडीक जमीन लागवडीखाली आणून उपलब्ध जमिनीचा पोत सुधारूण उत्पादनात वाढ करणे.

७.     शेतकऱ्यांसाठी कृषी संशोधन , माहिती व मदत, कृषी सेवा केंद्र स्थापन करून शेतकऱ्यांना सेवा पुरविणे.

८.     युवकांमध्ये शेती, शेती व्यवसायाची आवड निर्माण व्हावी यासाठी महाविद्यालये, विद्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये विविध उपक्रम राबविणे.

९.     कृषी व्यवसायातून जमीन पाणी हवा यांचे होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी उपाय योजना राबविणे.

१०.  सेंद्रिय शेती तसेच यांत्रिक शेतीला प्रोत्साहन देणे.

११.  शेतकऱ्यांसाठी शिबीर, चर्चासत्र,मेळावा, स्नेहसंमेलन, कृषी प्रदर्शनाचे आयोजन करणे.

१२.  शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठी शिष्यवृत्ती, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन तसेच कृषी औद्योगिक संस्थांच्या गरजेप्रमाणे माहिती तंत्रज्ञानाने परिपूर्ण कार्यकुशल  कर्मचारी वर्ग  तयार करणे.

१३.  संस्थेच्या वतीने कृषी , सामाजिक ,वैद्यकीय, तांत्रिक व इतर विविध क्षेत्रातील समाजासाठी थोर व कर्तृत्ववान व विद्वान व्यक्तींचा सत्कार समारंभ , पुरस्कार , गौरव, मानपत्र देऊन त्यांचे आदर्श मौलिक विचार समाजापर्यंत पोहचवणे .

१४.  संस्थेच्या वतीने कृषी विषयक जनजागृतीसाठी दैनिक मासिक , साप्ताहिक , त्रैमासिक,तसेच स्वतंत्र कृषी वाहिनी सुरु करून प्रोत्साहन देणे.

१५.  शहरी भागात शिक्षण , व्यवसाय ,नोकरीच्या निमित्ताने राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुला- मुलींसाठी वसतीगृह,खाणावळ ,रसवंती गृह , ज्यूस सेंटर सुरु करणे.

१६.  कायद्याच्या चौकटीत बसतील असे राज्यशासन , केंद्र शासन  यांचे विविध उपक्रम , संस्थेच्या वतीने यशस्वीरीत्या राबविणे.