१.     मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्राक्रिया शिबीर

डॉ. मनोहर डोळे मेडिकल फौंडेशन नारायणगाव यांचे  मार्गदर्शन व सहकार्याने दि. ५ जानेवारी २०१५ रोजी श्रीकृष्ण मंदिर अभाळवाडी ता. संगमनेर जि. अहमदनगर या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्राक्रिया शिबिराचे आयोजन संस्थेमार्फत करण्यात आले होते. या शिबिरामध्ये २१२  व्यक्तींनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली. ७५ व्यक्तींना चष्म्याचे वाटप करण्यात आले. व २५ रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्राक्रिया करण्यात आली.

२.     रक्तदान शिबीर

अक्षय ब्लड बँक हडपसर पुणे व कृषी विज्ञान मंडळ काळवाडी  यांच्या मदतीने दि. २५ जानेवारी २०१५ रोजी ग्राम विकास भवन काळवाडी ता. जुन्नर जि. पुणे या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजीत केले होते. संस्थेच्या सर्व सभासदांनी स्वतः रक्तदान केले. एकूण ७० व्यक्तींनी या शिबिरात रक्तदान केले आहे. या शिबिरातील सर्व रक्त दात्यांना संस्थेच्या वतीने 8 GB pen drive चे वाटप करण्यात आले.

३.     शैक्षणिक उपक्रम

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना सवलतीच्या दारात दर्जेदार संगणकीय, व्यावसायिक प्रशिक्षण उपलब्ध व्हावे, तसेच त्यांच्यातील कौशल्य विकसित व्यावीत या हेतूने केंद्रीय संगणक व व्यावसायिक प्रशिक्षण मंडळाची अधिकृत मान्यता घेऊन संस्थेने Edu-Tech Computers & Academy या प्रशिक्षण केंद्राची स्थापना एप्रिल २०१५ रोजी आळेफाटा ता. जुन्नर जि. पुणे या ठिकाणी केली आहे. या प्रशिक्षण केंद्रा मार्फत विद्यार्थ्यांना सवलतीच्या दारात संगणक प्रशिक्षण दिले जाते. तसेच संस्थेच्या सभासदांकडून मोफत करियर मार्गदर्शन केले जाते.

४.     कृषी माहिती संकलन, संगनकीयकरण तसेच यांत्रिकीकरण प्रकल्प योजना (पथदर्शी)

हा संस्थेचा मुख्य पायाभूत प्रकल्प असून या प्रकल्पामध्ये जागोजागी शेतकरी माहिती केंद्रे उभारून शेतकऱ्याच्या सर्व प्रकारच्या उदा. जमीन मशागत पिक पाणी इत्यादी. माहितीचे एकत्रित रित्या संकलन करून स्वतंत्र संकेतस्थळावर नोंदणी करण्यात येणार आहे. माहिती केंद्रामार्फत शेतकरी, व्यापारी, शेतकरी संस्था,कंपन्या, संशोधक, शासन याच्यातील उपलब्ध माहितीची देवाण घेवाण करून सर्वांचे हित लक्षात घेऊन एकात्मिक विकासाबाबतचे धोरण अवलंबले जाईल. या पथदर्शी प्रकल्पाची सुरवात ऑगस्ट २०१५ पासून जुन्नर तालुक्यातून  केली जाणार आहे.