ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील उच्च शिक्षित तरुणांनी एकत्र येऊन, "शेती क्षेत्रात आधुनिक शिक्षण, माहिती तंत्राज्ञान तसेच आधुनिक साधन सामुग्रीच्या मदतीने शेती पूरक पायाभूत सेवा सुविधासोबत शेती व शेतकऱ्याच्या सर्वांगीण विकासव्हावा या उद्देशाने एज्यु-टेक अॅग्रो फाऊंडेशन या संस्थेची स्थापना १५ ऑगस्ट २०१३ रोजी करण्यात आली आहे. संस्थेची नोंदणी मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा १९५० व संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये करण्यात आली आहे.