एज्यु टेक अग्रो फौंडेशन या संस्थेच्या दिनांक ५ मे २०१६ रोजी नियोजित वार्षिक सभेत संस्थेचे वार्षिक कार्यक्रम निश्चित करण्यात आले त्यांच्या अंमलबजावणीसाठी आपल्या सूचना तसेच मार्गदर्शनाची गरज आहे.   

१. वृक्षारोपण कार्यक्रम 

पिंपळवंडी—काळवाडी—उंब्रज- खामुंडी या रस्त्याच्या दोन्ही बाजूस वृक्षारोपण करण्याचे ठरविण्यात आले आहे, यातील पहिल्या टप्प्यातील काम जुलै २०१६ मध्ये काळवाडी—उंब्रज या रत्याच्या दोन्ही बाजूस कमीत कमी १०० वृक्षांचे रोपण करून केले जाणार आहे. पुढील ३ वर्ष हा उपक्रम संस्थेच्या मार्फत राबविला जाणार आहे. 

२. आरोग्य तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन 

दर वर्षी एप्रिल/मे महिन्यात काळवाडीमध्ये सलग ४ ते ५ दिवस यात्रा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो या यात्रेला जोडून शेवटच्या दिवशी काळवाडीमध्ये आरोग्य तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन संस्थे मार्फत केले जाणार आहे. 

३. कलाविष्कार कार्यक्रम 

ग्रामीण भागातील, तसेच शेतकरी वर्गातील मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा व त्या साठी एक व्यासपीठ उभे राहावे हा उद्देश समोर ठेऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन म्हणजेच कलाविष्कार कार्यक्रमाचे आयोजन संस्थेमार्फत काळवाडी या ठिकाणी यात्रेच्या शेवटच्या दिवशी संध्याकाळी केले जाणार आहे. 

४. निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन 

 ग्रामीण भागातील, शेतकरी वर्गातील मुलांच्या विचार करण्याच्या क्षमतेला वाव मिळावा तसेच त्यांच्यात वक्तृत्व कौशल्य निर्माण होऊन सभाधिट पणा वाढला जावा हा उद्देश समोर ठेवत निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन श्री महालक्ष्मी विद्यालय उंब्रज या महाविद्यालयात केले जाणार आहे. हि स्पर्धा विविध गटांत घेतली जाणार जाणार असून विजेत्यास योग्य ते पारितोषिक संस्थेकडून दिले जाणार आहे. 

संस्थेचे सध्याचे सर्व स्वयंसेवक हे श्री महालक्ष्मी विद्यालय उंब्रज या महाविद्यालयातील २००५ दहावीचे वर्ग मित्र आहेत. जर आपल्यापैकी कुणाला सामाजिक कामाची आवड असेल तर आपण हि या संस्थेचे स्वयंसेवक सेवक होऊ शकता आणि वरील उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता.. 
या ठिकाणी आपल्या सूचना व मार्गदर्शन देऊन देखील आपण या उपक्रमात सहभागी होऊ शकता...

धन्यवाद