१. आपल्याकडील शेती व्यवसाय हा बेरोजगार व अशिक्षित लोकांनी आपल्यासमोर कोणताच पर्याय नाही, फक्त पोटापाण्याची खळगी भरावीत म्हणून स्वीकारला असेल तर ते किती मनापासून शेती करत असतील.?
२. जर एखाद्या शिक्षित तरुणाला शेतीची आवड असेल तर त्याने पारंपारिक कष्टाची शेती का करावी? त्याचा कल यांत्रिक शेतीकडे असेल तर तर त्याने यांत्रिक शेती का करू नये? अन यांत्रिक शेती हि भांडवली शेती आहे. त्याने हे भांडवल आणायचे कोठून? भविष्यातील मिळकतीची कोणतीच हमी नसेल तर त्याला लोकांनी भांडवल का द्यावे?
३.चुकून जर त्याला भांडवल मिळाले त्याने मेहनतीने शेत माल पिकविला तर पुढे त्याचा शेतमाल नेमका नैसर्गिक आपत्तीत किंवा मंदीच्या बाजारभावात सापडतो, यात त्याचे गुंतवलेले पैसे जर निघत नसतील तर त्याने भांडवलासाठी घेतलेले पैसे कसे परत करावे? अन पुढे कर्जबाजारी होण्यासाठी त्याने शेती करावी का?
Comments
Be the first to add a comment.